Chandu Chavan News 2025 live update : चंदू चव्हाण यांचे उपोषण देशसेवेसाठी समर्पित जवानाला अन्यायाची वागणूक
देशसेवेच्या निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या भारतीय सैनिकांमध्ये अनेकदा काही घटना अशा घडतात ज्या त्यांच्या आयुष्याला नवे वळण देतात. अशाच एका चर्चेत आलेल्या घटनेचा भाग म्हणजे चंदू चव्हाण. नजर चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या चंदू चव्हाण यांची कहाणी वेगळीच आहे. त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या त्रासानंतर मायदेशी परतल्यावरही न्यायाची प्रतीक्षा आहे.
चंदू चव्हाण यांनी आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करत उपोषण सुरू केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सीमाच्या हाताला काम देणाऱ्या सरकारकडून देशासाठी समर्पित सैनिकाला अशी वागणूक मिळणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
“जवानांना न्याय हवा, व्हिडिओग्राफी अनिवार्य करा!”
चंदू चव्हाण यांच्या मते, सध्या भारतीय लष्करात असे अनेक जवान आहेत, ज्यांना लष्करातून चुकीच्या कारणांसाठी बाहेर काढले जाते. त्यांनी दावा केला आहे की आतापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त जवानांना अशा प्रकारे सेवेतून वगळले गेले आहे. चंदू यांनी अशीही मागणी केली आहे की, जेव्हा जवानांवर कारवाई केली जाते, तेव्हा त्याची व्हिडिओग्राफी अनिवार्य करावी, जेणेकरून पारदर्शकता राहील आणि कोणताही अन्याय होणार नाही.
“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, 15 लाखांचं कर्ज!”
चंदू चव्हाण यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले आहे. त्यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून ते भीक मागत आहेत. सैन्यातून काढून टाकल्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी पात्र ठरवले जात नाही. खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज केल्यानंतरही त्यांच्यावर सैन्याचा शिक्का असल्याने वेरिफिकेशनच्या कारणाने नकार दिला जातो.
*सरकारवर टीका आणि समाधानाची मागणी*
चंदू चव्हाण यांनी असेही म्हटले की, सैनिक देशसेवेसाठी जातो, आतंकवादी व्हायला नाही. सरकारने त्यांच्यासारख्या सैनिकांसाठी योग्य उपाययोजना करावी आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
चंदू चव्हाण यांची मागणी:
1. जवानांवरील कारवाई दरम्यान व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक करावे.
2. लष्करातून काढलेल्या जवानांना नोकरीची संधी मिळावी.
3. चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारवाईंची चौकशी व्हावी.
चंदू चव्हाण यांचे आंदोलन त्यांच्या न्यायासाठी सुरू आहे. त्यांच्या मागण्यांना सरकार कितपत प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देशसेवेसाठी समर्पित अशा जवानाला न्याय मिळणे हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हक्कांसाठी नाही, तर इतर जवानांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
वाचा सविस्तर बातमी
ladki bahin yojna update 2025: योनेत होणार मोठे बदल मंत्री अदिती तटकरे यांचे वक्तव्य