wardha to Pandharpur 2024 : आजनसरा ते पंढरपूर कडे जाण्याकरिता पालखी रवाना
महाराष्ट्र मध्ये ओळखला जाणारा मुख्य सण म्हणजे आषाढी एकादशी हा आहे येतो आहे. त्यामध्ये अनेक वारकरी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पैदल पैदल जातात एका किंवा अधिक महिन्याआधी आपल्या घरून बाहेर पडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री विठ्ठल म्हणजेच पांडुरंग यांच्या भेटीला हे सगळे वारकरी जात असतात.
त्यातूनच महाराष्ट्रात महाराष्ट्रातून वर्धा जिल्ह्यात असणारे श्री क्षेत्र आजनसरा संत भोजाजी महाराज यांचे निवासस्थान येथून पंढरपूर कडे जाण्याकरिता पालखी मोठ्या थाटामाटात निघाली आहे. यात अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेऊन आपल्या वारकरी संप्रदायाचे जतन करत भजन आणि भक्ती गीत म्हणत भोजाजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. हे सगळे वारकरी आणि श्री संत भोजाजी महाराज यांचे भक्त पंढरपूरला जाऊन आपले सुख दुःख पांडुरंगाला सांगून आषाढी एकादशी एका मोठ्या सणाप्रमाणे पार पाडतील.
राम कृष्ण हरी, श्री संत भोजाजी महाराज कि जय …
हेही वाचा…. संपूर्ण बातमी… 1 } Work From Home jobs: घरी बसून कमवा रोज 1000 रू
2 } पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचा प्रश्न ही कुठली मराठी आहे. बघा काय घडलं